अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मध्ये मतदानाची जागृती व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने राबविलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रम बोरगाव नगर पंचायत वतीने राबवून मतदारांना जनजागृती केली.
मतदानाचा टक्का वाढीसाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे .त्याचाच एक भाग म्हणून गावागावात मतदान विषय जनजागृती करण्यात येत आहे.बोरगांव नगर पंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रारंभी चीफ अधिकारी नरेश रेड्डी यांनी सर्वांचे स्वागत करून मतदान जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाले की , मतदान हा सर्वांचा एक नैतिक हक्क आहे .आणि तो हक्क आपल्याला बुडवायचा नाही मतदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. या मतदानातूनच एक सशक्त सरकार निर्मिती होते. मतदानाचा टक्का वाढीसाठी हा सरकारने उपक्रम चालविला असल्याचे सांगितले. *. मतदान जागृतीच्या उध्येश्याने बोरगांव येथील प्रमूख मार्गावरून रॅली काढण्यात आली .या कार्यक्रमात पंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या,तलाठी,गावातील सरकारी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित सर्वांनी मी मतदान करणार अशी रिंगण सोहळा तून शपथ घेतली.
या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी नरेश रेडी, दुय्यम दर्जा लिपीक पोपट कुरळे,विजय चौगुले,संदीप वाईंगडे,जयपाल नेजे, गजाला जमाला,महालींग गजरे,निलेश उरणकर,नचिकेत मानवी सह पंचायत कर्मचारी,तलाठी वर्ग,अंगणवाडी,आशा,शिक्षक, विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
