कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर क्र. 3 शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणारी कुमारी शर्वरी राजगोंडा पाटील हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला.तर याच शाळेचे पाच विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत कुरुंदवाडसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.या परीक्षेत कुमारी शर्वरी राजगोंडा पाटील हिने 96 टक्के गुण घेऊन राज्यात तिसरा येण्याचा मान मिळविला तर स्वरा अवधूत चव्हाण हिने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. याशिवाय श्लोक संदीप काटकर, आरव दीपक गंगधर, अन्वेश अभिजीत कुंभोजे यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. याच प्रशालेचे दोन विद्यार्थी दुसरा, तर सात विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा येण्याचा मान मिळवले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रवीकुमार पाटील,शिक्षक किरण माने यांचे मार्गदर्शन लाभले.
