शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार जनजागृतीकरीता शिरोळ शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाकडुन पुरस्कृत केलेल्या (SVEEP) कार्यक्रमांतर्गत शिरोळ नगरपरिषदेकडुन शिरोळ शहरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करणेकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये शहरामध्ये मतदान जनजागृतीचे पोस्टर्स प्रदर्शित करुन, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, नागरिक, नगपरिषद कर्मचारी यांचे सहभागाने शहरात प्रभात फेरी, सायकल रॅली काढुन जनजागृती केली. शहरातील आठवडी बाजार, मुख्य बाजारपेठ येथे पोस्टर्स लावुन मतदारांमध्ये जनजागृती केली. तसेच महाविद्यालयांमध्ये नवमतदार नोंदणी करणेकरीता मागदर्शन करण्यात आले. सदर उपक्रम पार पाडण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या मागदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, कर निरीक्षक चंद्रकांत पाटील, नगर अभियंता श्रीधर डुबुले, लेखपाल हरीपांडू कामुन, कर निरीक्षक अश्विनी पाटील, कार्यालय अधीक्षक, संदिप चुडमुंगे, लिपिक अमोल बन्ने व नगरपरिषद कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडले.
