Top News

युवकांनी निर्भयपणे मतदान करावे: सहाय्यक निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण

 




जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी मतदान नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा.असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.

              त्या जयसिंगपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात जयसिंगपूर व परिसरातील १०वी,१२वी च्या मुलांमुलींसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला जवळपास ५०० विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्या तेथील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आपले नाव नोंदवण्यासाठी आता वर्षभर वाट पाहण्याची आवश्यकता नाही तर १जानेवारी,१जुलै आणि १ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर जास्तीत जास्त युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून आपणाला भारतीय राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा. जेणेकरून भारतीय लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. याप्रसंगी शिरोळचे तहसीलदार श्री.अनिलकुमार हेळकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने