शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील राजर्षि शाहू विद्या मंदिर शिरोळ नं.१ येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिरोळ तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले. नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.जिल्हा सल्लागार सुरेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव खाडे, तालुकाध्यक्ष - विनायक मगदूम,कार्याध्यक्ष - बाळासो कोळी,सरचिटणीस -राजेशकुमार यादव तर कोषाध्यक्षपदी संजय पाटील, महिला आघाडी प्रमुख सविता जाधव, उपाध्यक्षा -नीता चव्हाण व महिला संघटक पदी सुमन भबुजे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून सयाजीराव पाटील होते.जिल्हा व तालुक्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक करताना मावळते तालुकाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, गुणवंत विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक, आदर्श शिक्षक यांचा सत्कार केला.महिला दिनानिमित्त शुभेच्छापत्र दिले.मुस्लिम बांधवांची संख्या सुद्धा जास्त आहेत रमजान ईद च्या शुभेच्छापत्र दिल्या.शाळा बंद होऊ नये म्हणून पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांना निवेदन देऊन तालुका स्तरावरती मोठा मोर्चा आणि आंदोलन या ठिकाणी केले होते. जुनी पेन्शन मिळावी यासाठी सुद्धा तालुकास्तरावरती मोठा मोर्चा काढला.रविवारचे प्रशिक्षण पूर्णपणे बंद केले २०१५ ला नागपूरच्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवली.साने गुरुजी पतसंस्था, कुरुंदवाड पतसंस्था आणि खर्डेकर पतसंस्था या संस्थामध्ये समितीचे संचालक आहेत.
शिक्षक नेते भगवान कोळी म्हणाले की समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते नेहमी अपडेट असतात.शाळा सुंदर केल्या आहेत. शिक्षक बॅंक चेअरमन व राज्य संघटक राजेंद्रकुमार पाटील म्हणाले की,अमृत संजीवनी योजनेच्या संदर्भात विरोधक दिशाभूल करीत आहेत.सभासदांना वस्तुस्थितीची माहिती देणे गरजेचे आहे.सभासदांच्या हिताची योजना असल्यामुळे कुटुंबे उघड्यावर पडू नयेत,जामीनदार अडचणीत येवू नयेत यासाठी योजना राबविली जाणार आहे.बिगर कर्जदारांनाही कुठेतरी थोडासा आधार देता आला तर तो देता यावा यासाठी आम्ही योजना राबवताना ५० हजार रुपयांवर यावर्षी व्याज आकारणी केली.वर्षाच्या साडेतीन हजार रुपयांच्या या कपाती पोटी त्याला सात लाखाचं सुरक्षा करून त्याचं कर्ज नाही त्याला सुद्धा सात लाख रुपये मिळतील.
पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले की, आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत.नवीन भरती नाही परंतु जुने कमी होत आहेत आणि कमी होत असताना या सर्वांना सोबत घेऊन जे काही अजून संघटनासोबत नाहीत.अशा मित्र लोकांना सोबत घेऊन आता विनायक मगदूम यांना वाटचाल करावी लागेल.
शिक्षक नेते जोतीराम पाटील म्हणाले, की शिक्षक समितीमध्ये काम करताना जे काय करावे लागेल ते शिरावर आणि उरावर घेऊन केले. काही वेळा शिरावर घेतलं आणि काही वेळा उरावर देखील घेतलं. संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महानगर पालिका राज्याध्यक्ष -सुधाकर सावंत म्हणाले की,स्वतःचे मत खरे न मानता इतरांचे मत ही खरे माना.शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील म्हणाले की,तुम्हाला विनंती राहील ही शिक्षक समितीमध्ये तीन-तीन वर्षाला अध्यक्षपद बदलले जातात.तीन-तीन वर्षाला राज्याची नेते पदे बदलली जातात.तीन तीन वर्षाला जिल्हा अधिवेशन घेतली जातात.तीन-तीन वर्षाला तालुका अधिवेशने घेतली जातात.आपण सुद्धा एक मानसिकता ठेवावी की तीन वर्षानंतर या ठिकाणी पाय उतार व्हायचा आहे.अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण निश्चितपणाने पूर्ण कराल याची खात्री आहे.भविष्यामध्ये संघटना वाढीसाठी जुन्या मंडळींचा खूप मोठ्या प्रमाणात आपणाला फायदा होईल.
जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर म्हणाले की,महाराष्ट्रात पहिल्यांदा नव भारत साक्षरतेला समितीने विरोध केला.इंग्लंड मध्ये आता पंधरा टक्के खर्च शिक्षणावरती करते मात्र आपल्याकडे अजूनही हा खर्च चार टक्के साडेतीन टक्के वरती आहे.प्राथमिक शिक्षणा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे.आपला देश गोरगरिबांचे शिक्षण कसं बंद पडेल हे पाहत आहे.तुम्ही आम्ही या गोरगरिबांच्या मुलांच्या शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाही तर गोरगरिबांचे शिक्षण थांबणार आहे.दोन तीन किलोमीटरवर ती शाळा असेल कोणत्याही परिस्थितीत भविष्यामध्ये प्राथमिक शिक्षण या गोरगरिबांचं झालंच पाहिजे ते त्यांच्या वाडीवस्तीवर झालं पाहिजे.यापूर्वी सुद्धा आपण आंदोलन केले त्यावेळी आपल्याला प्राध्यापक एन.डी. पाटील साहेबांचा प्रचंड मोठे सहकार्य मिळाले.
याप्रसंगी महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे,पुणे विभागीय प्रसिद्ध प्रमुख हरिदास वर्णे,शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गणपतराव मांडवकर,जिल्हा कोषाध्यक्ष सुनील कुंभार,शिक्षक बँकेचे सर्व संचालक रामदास झेंडे,बाबुराव परीट,अर्जुन जानकर,नारायण आयरे,तानाजी कलिकते,विठ्ठल भाट,रमेश कोळी,श्रीकांत कुरणे,मारूती कोळी,संजय पाटील,रा.बा.कोळी,संजय निकम,उदय सावगावे,परशराम चव्हाण,धोंडीराम बाबर,विठू बंडगर,सुभाष तराळ,अमित कांबळे,शुभांगी कोळी,सविता जाधव,नीता चव्हाण,सुमन भबुजे,अस्मिता मगदूम यांचे सह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन गायकवाड यांनी केले तर आभार नूतन तालुकाध्यक्ष विनायक मगदूम यांनी मानले.
