Top News

चक्कर येऊन पडल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  शनिवारी दहावी परीक्षा संपवून बाथरुममध्ये ताजेतवान होण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. निपाणी शहरा बाहेरील गव्हाण हद्दीतील मोरारजी वसती शाळेत शनिवारी (दि. ६) दुपारी ही घटना घडली. पारस सुधाकर तोडकर (वय १६, मूळ रा. कुठाळी, ता. चिकोडी) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पारस याचे मूळ गाव कुठाळी असून तो मोरारजी वसती शाळेत दहावीत शिकत होता. शनिवारी दहावीचा शेवटचा पेपर देऊन आल्यानंतर तो शाळेतील बाथरुममध्ये ताजेतवाने होण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत शाळा व्यवस्थापनाने मयत पारसचे वडील सुधाकर यांना माहिती दिली. मयत विद्यार्थी परस याचे शव पुढील तपासा साठी बेळगावं येथील शासकीय रुग्णलयांमध्ये रात्री पाठवले असता आज रविवार दिनांक 7/4/2024. रोजी सकाळी शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

    सदर घटनेची निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलिस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक उमादेवी पुढील तपास करत आहेत. * मयत विद्यार्थी परस तोडकर याचे मूळ गाव चिकोडी तालुक्यातील कुठाली असून,बोरगाव हे त्याचे आईचे गाव. पारस हा मनमिळाऊ स्वभावाचां होता. अचानक निधनाने बोरगांव सह परीसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. मयत पारसच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

थोडे नवीन जरा जुने