शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था (हसूर ) या संस्थेच्या शिरोळ शाखेचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी ( दि ९ ) सकाळी १० वाजता समर्थ मंगल कार्यालयासमोरील इमारतीत होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन नेमगोंडा रावसाहेब पाटील यांनी दिली.
ते म्हणाले , शिरोळ शहरातील ग्राहक , ठेवीदार व सभासदांची मागणी असल्याने हसुर (ता शिरोळ )येथील कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शिरोळ येथे तिसरी शाखा सुरू होत आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या हस्ते शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील , नियोजन मंडळाचे सदस्य दलितमित्र अशोकराव माने , शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील , जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील - यड्रावकर ,श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव , स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सौरभ शेट्टी ,मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष सुभाषसिंग राजपूत , शिरोळ तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष पांडुरंग उर्फ अविनाश माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे . यावेळी सामाजिक सहकार शैक्षणिक क्रीडा व उद्योग - व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कल्पद्रुम ग्रामीण पतसंस्थेने सामान्य नागरिक यासह व्यापारी ,उद्योजक आदिना चांगला कर्ज पुरवठा केला आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम करून वेगवेगळ्या योजनेतून कर्जरूपाने त्यांना मदत केली आहे . ठेवी व ठेवीवरील आकर्षक व्याज दर यासह विविध योजना राबवून संस्था सभासदांचे हित जोपासत आहे . शहरीसह ग्रामीण भागात कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत असून कल्पद्रुम पत संस्थेच्या शिरोळ शाखा शुभारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी कल्पद्रुम पत संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप चौगुले , मॅनेजर संजय पाटील , शिरोळ चे शाखाधिकारी अनुपम चौगुले आदी उपस्थित होते.
