अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक व महाराष्ट्रातील भक्त जनांचे आराध्य दैवत, व जनवाड तालुका चिकोडी येथील जागृत तीर्थस्थान महादेव स्वामी धर्मर मठाची वार्षिक यात्रा सोमवार दि.११ ते रविवार दि.१७ मार्च अखेर संपन्न होणार आहे . शुक्रवार दि.१५रोजी दुपारी भव्य जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जनवाडच्या महादेव स्वामींची ही वार्षिक यात्रा चिकोडी तालुक्यातील प्रसिद्ध मोठी यात्रा म्हणून परिचित आहे .या यात्रेसाठी कर्नाटक ,महाराष्ट्र, गोवा व कोकण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत असतात यावेळी यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी पहाटे महादेव स्वामी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा करून,दंडवत, व गावातील नैवेद्य दाखविणे कार्यक्रम झाला.मंगळवार दि.१२ रोजी आदिशक्ती देवीची यात्रा, नैवेद्य व आदिशक्ती देवीची ओटी भरणी कार्यक्रम . बुधवार दि. १३ ला सकाळी महाप्रसाद या यात्रेचे आनखिन एक वैशिष्ट्य म्हणजे जातीवंत जनावरांचे प्रदर्शन होय हे प्रदर्शन शुक्रवार दि १५रोजी दुपारी ३ वाजता आहे.४ पशु संगोपन अधिकारी, कृषी उत्पन बाजार समिती निप्पाणी व ट्रस्ट कमिटी यांचे वतीने आयोज़न केले आहे. अनुक्रमे
प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकास पारितोषिक व प्रमाणपत्र, शिल्ड देण्यात येणार आहे. प्रदर्शनास येणाच्या बैलजोडीस बुधवार हजर असणे गरजेचे असून बैल, म्हैस व गाय याची देवाण घेवाण होणार आहे. खेळणी ,मेवा मिठाई,पाळणे, ,भांडी दुकान मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत..त्याना कमिटीचे सदस्य जागा अखुन देत आहेत. यात्रेसाठी महादेव स्वामी धर्मर मठ यात्रा कमिटीचे नेटके नियोजन केले आहे.मठावर आकर्षक विद्युत रोषणाई,व सजावट केली आहे.ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम,व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जनवाड ग्रामस्थ दक्ष राहिले आहेत.
