Top News

खासदारांना अण्णासाहेब जोल्ले व उत्तम पाटील इफ्कोच्या निवडणुकीत यश

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 इफ्को कंपनी नवी दिल्ली यासाठी हुबळी विभागातील प्रतिनिधीच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत खासदार अण्णासाहेब जोल्ले साहेब व सहकारत्न उत्तम रावसाहेब पाटील यांचे नेतृत्वाखाली 16 उमेदवार निवडून आले असून त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला घवघवीत यश संपादन झाले आहे देशातील नामांकीत अशी खत उत्पादनामध्ये नवी दिल्ली येथील कंपनी आघाडीवर आहे. नवी दिल्ली येथे असलेल्या कंपनीचे संचालक पदासाठी हुबळी येथे नुकताच विभागीय सदस्य प्रतिनिधी निवडणूक होत असते हुबळी डिवीजन मधून होणाऱ्या या निवडणुकीत उत्तर कन्नड दावणगिरी, हावेरी, हुबळी, धारवाड, विजापूर ,बागलकोट व बेळगाव अशा या सहा जिल्ह्यातील सुमारे दहा लाखावर गुंतवणूक केलेल्या शेअर धारकांच्या साठी मतदार मतदान करीत असतात या निवडणुकीत एकूण 64 मतदारांनी मतदान केले असून खासदार अण्णासाहेब जोंल्ले व उत्तम पाटील यांच्या पॅनल मधील सोळा उमेदवार निवडून आले आहेत या मध्ये एक्समभा येथील जोल्ले उद्योग समुहाचे शिल्पकार, खासदार अण्णासाहेब जोल्ले व बोरगांव चे युवा नेते उत्तम पाटील, अरुण देसाई, बाळासाहेब आरगे मल्लाप्पा निगजनावर मुर्गेश माळगी, रामचंद्र हेगडे, रमेश भिवसे ,रवींद्र हेगडे, सचिन केसते संजय चौगुले ,शिवलिंगा पाटील, श्रीशैल पडेदार सिद्धनाथ पाटील, सुभाष चौगुले, यांचा समावेश आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले व युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह उर्वरित 14 जणांनी इफको च्या रिप्रेजेंटिव्ह जनरल बॉडी मध्ये प्रतिनिधी म्हणून यांची एकमताने निवड झाली आहे या निवडीनंतर बोलताना अण्णासाहेब जोले व उत्तम पाटील म्हणाले की सहा जिल्ह्यातून हुबळी डीविजनासाठी झालेल्या या निवडणुकीत सहकार्य केलेल्या सर्वांचे आम्हीं मनापासून आभारी आहोत.आमच्या बरोबरच या आर जी बी मेंबर मधून निवड झालेल्या सर्वांच्या अभिनंदन. यापुढे असे सहकार्य सर्वांचे रहावे अशी अपेक्षा व्यक्त केले.  खासदार अण्णासाहेब जोल्ले व युवा नेते उत्तम पाटील यांच्या पॅनेलने मिळवलेल्या हुबळी इफको कंपनी विजयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने