अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोडणी ता निपाणी गावात आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली असून कोडणी- निपाणी रस्त्याचे लवकरच रुंदीकरण केले जाईल अशी ग्वाही आमदार शशिकला जोले यांनी दिली.
कोडणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३ कोटी २८ लाखातून जलजिवन मिशन योजना शुभारंभ व १८ लाखातून निर्माण केलेल्या अंगणवाडी लोकार्पण असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खवरे होते. राजेंद्र कानडे यांनी स्वागत करून जोल्ले यांनी राबविलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. प्रारंभी महिलांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. आमदार जोल्ले यांनी टिकाव मारून कामाचा प्रारंभ केला.
आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी उज्वला गॅस , किसान सन्मान, आरोग्य विमा, यासारख्या अनेक योजना अमलात आणल्या आहेत. जनतेला शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने जलजीवन मिशन योजना अमलात आणली आहे. यामुळे आता नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. निपाणी मतदारसंघात आतापर्यंत 50 अंगणवाडी निर्माण केल्या असून कोडणी, गायकनवाडी येथे आठ अंगणवाडी निर्माण केल्या आहेत. मतदार संघातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिले जात असून त्यासाठी महिलांनी पुढे यावे. येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत खासदार अण्णासाहेब जोले यांना दुसऱ्यांचा संधी द्या असे आवाहन केले.
हालशुगर चेअरमन एम.पी पाटील म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोले, आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा कायापालट केला असून जनतेने त्यांच्या पाठीशी रहावे असे आवाहन केले.
यावेळी माजी एपीएमसी अध्यक्ष अमित साळवे, भाजप ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराटे, रावसाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हाल शुगर संचालक प्रकाश शिंदे, पीएलडी बँक अध्यक्ष एस.एस ढवणे, माजी तालुका पंचायत सदस्य सदाशिव बुदीहाळे, अरुण खवरे, प्रकाश स्वामी, ग्रामपंचायत उपाध्यक्षा ललिता तोरणे, सदस्य गणपती खोत, अशोक महाजन, सुनील खवरे, रवी खोत, शितल शिंदे, वनिता कोले, सीडीपीओ राममूर्ती, ग्रामविकास अधिकारी अश्फाक शेख यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आभार सदाशिव बुदिहाळे यांनी मांनले.
