प्रल्हाद सांळुखे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे सद्गुरु बाळूमामा मंदिरासमोर गुरुदत्त साखर कारखान्याजवळ श्रावण बाळ वर्धा आश्रम येथे बुधवार दिनांक 5 /3/ 20 24 रोजी सायंकाळी सात वाजता कै, धोंडीराम रामगोंडा पाटील दत्तवाड यांच्या समर्थनात सौरव पाटील युवा नेतृत्व यांच्या वाढदिवसा निमित्त आश्रमातील वृद्ध नागरिकांना कपडे व जेवण तयार करून त्यांच्या समवेत सर्व नागरिकांना मायेचा त्यांना स्वतःच्या हाताने घास भरवून साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत सम्मेद चौगुले, रोहित पाटील, शुभम इंगळे, सुमित चौगुले, निखिल जोगळे, प्रवीण पाटील इत्यादी मोठ्या प्रमाणात मित्र परिवार येऊन या वृद्ध लोकांच्या समवेत आपला वेळ घालून त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी संस्थेच्या संचालिका शोभाताई पानधारे यांनी आरती करून स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश सासणे यांनी आभार मानले हा कार्यक्रम दिन दुबळ्यासाठी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी वृद्धाश्रमातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी सौरभ पाटील यांना भरभरून आशीर्वाद दिला
