Top News

हलकर्णी भाग इंग्लिश मीडियम स्कूल बसर्गे येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात

 


सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीचे फोटो पूजन आणि दिप प्रज्वलनाने झाली. विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान व कला सादर करून एकात्मतेचा संदेश दिला आहे. कार्यक्रमाचा हेतू फक्त विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा हा होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन चंद्रकात पाटील होते. प्रास्तविक कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले .शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठीमाजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, भरत पाटील, शोभा पाटील, रामलिंग दुध्यागोळ, संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर पाटील , संस्था प्रतिनिधी शिवाजी लोखंडे, नारायण पाटील सर व संजय चौगुले तसेच पालकवर्ग उपस्थित होते.

 

थोडे नवीन जरा जुने