प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
अजित पवार गट राष्ट्रवादीक विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदी प्रतिक कुन्नुरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अजित पवार गट दिग्विजय माने यांची तालुका अध्यक्ष पदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली,कुन्नुरे हे या आदी तालुका उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते,त्यांचे प्रामाणिक पणे काम करण्याची पद्धत व एकनिष्ठ पणा पाहून,व त्यांच्या कामाची दखल घेऊन तालुका अध्यक्ष पदी निवड जिल्हाध्यक्षच्या हस्ते करण्यात आली,या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आसुर्लेकर,अमर भय्या माने, प्रकाश पाटील टाकवडेकर,निहाल कलावंत, विविध मान्यवर, तसेच व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
