Top News

कन्या नांदणी शाळेत ८ मार्चला भरणार १२वे बालसाहित्य संमेलन

नांदणी / शिवार न्यूज नेटवर्क :

कै. शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिर नांदणी ता. शिरोळ येथे शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी १२वे बालसाहित्य संमेलन संपन्न होणार आहे.

    जागतिक महिला दिनानिमित्त,महिला सबलीकरण व्हावे,महिला व मुलींना व्यासपीठ मिळावे यासाठी कथाकथन,कविता वाचन, एकपात्री,नकला,नाटिका, व्याख्यान व परिसंवाद होणार आहे.   सकाळी ८ :३० वाजता ग्रंथदिंडीने बालसाहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे.सकाळी १०:३० वाजता नांदणीच्या सरपंच सौ.संगिता तगारे यांचे हस्ते उद्धाटन होणार आहे. सकाळी ११ वाजता सौ. मेघा उळागड्डे व कु. सोनाली पाटील यांचा सत्कार होणार आहे. कवयित्री व लेखिका सुरेखा आण्णासो वाडकर यांचे ११ :३० वाजता व्याख्यान आहे.

सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कु.श्रेया सचिन खराडे तर अध्यक्षस्थान कु.स्नेहल सुनिल क्षिरसागर भूषविणार आहे.  दुपारच्या सत्रात कु.मानसी सिध्देश्वर तनपुरे हिच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता मुलींचे काव्य सादरीकरण तर ४ वाजता "भरड धान्याचे महत्त्व" या विषयांवर परिसंवाद होणार आहे.  ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक उपस्थित राहणार आहे.

थोडे नवीन जरा जुने