शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
आई वृद्धाश्रम संस्थेमधील निराधार वृद्धांना निवाऱ्यासाठी हक्काची जागा नव्हती. त्यामुळे गेली आठ वर्ष संस्थेचे प्रमुख संजय भोसले व त्याच्या परिवाराने प्रामाणिक सेवेतून
घेतलेले कष्ट व त्याग कौतुकास्पद आहे. अशा सामाजिक कार्याला सर्वांनी साथ देण्याची गरज आहे. आई वृद्धाश्रम या संस्थेमधील वृद्ध माता - पित्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवेबरोबर पुण्याईचा मार्ग आहे .याकामी सर्वोतोपरी सहकार्य करू असा विश्वास जयसिंगपूरचे उद्योगपती विनोदभाऊ घोडावत यांनी व्यक्त केला.
निमशिरगांव ( ता शिरोळ ) येथे आई वृध्दाश्रम संस्थेच्या नूतन वास्तुचा गृहप्रवेश शुभारंभ उद्योगपती विपीन बियाणी व हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल काॅलेजचे चेअरमन डॉ सुकूमार मगदुम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी स्वागत कमानीचेही उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती विनोदभाऊ घोडावत होते .त्यावेळी ते बोलत होते. इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांच्या हस्ते वृद्धाश्रमाच्या वाटचालीबाबत
आभाळमाया विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांनी स्वागत केले. पास्टर शशिकांत कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योगपती विनोदभाऊ घोडावत, डॉ. सुकूमार मगदुम , उद्योगपती विपीन बियाणी ,सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने , रविंद्र सावंत यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास मनसेचे भगवंत जांभळे, डॉ.प्रसाद माने, डॉ रियाज अत्तार, डॉ.आशाताई गाडीवडर, रवि भोरे , प्रकाश रत्नाकर, धनपाल कनवाडे यांच्यासह आई वृध्दाश्रम संस्थेचे उपाध्यक्ष परशुराम ऐवाळे , सचिव - रेश्मा भोसले, संचालिका आनिता वाघमारे, हेमा भोसले, लक्ष्मी नायकवडी सुरूप आदमाने, परवीन जमादार , जुबेदा हेरवाडे
आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. गंगाराम सातपुते यांनी केले. सिनेअभिनेता रावसाहेब भोसले यांनी आभार मानले.
