Top News

हलसिद्दनाथ शुगर निपाणी कडून शेतकरी खात्यावर उस बील जमा : कारखान्याचे चेअरमन एम बी पाटील

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

चिकोडी लोकसभा चे लोकप्रिय खासदार आण्णासाहेब जोल्ले व निपाणी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३ गव-२४ या सालचा ऊस गाळप हंगाम २७ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होऊन २९ फेब्रुवारी रोजी गळीत हंगामची यशस्वी सांगता झाली. या ऊस गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या प्रती टन उसास प्रतिटन रु. ३००० प्रमाणे दर देण्यात आला आहे. आता शेवटच्या पंधरवड्याचे म्हणजेच १६ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी पर्यंत गाळप केलेल्या ३०३९५ मे टन उसाची होणारी रक्कम रु. ९.१२ कोटी इतकी रक्कम ज्या त्या ऊस पुरवठादार सभासद व शेतकरी यांच्या खातेवर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

   सन २०२३-२४ या गळीत हंगामामध्ये कारखान्याने गेल्या १२६ दिवसाच्या कालावधीमध्ये ७ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. तसेच या हंगामाची ऊस बिलाची पूर्ण रक्कम रु. २१०.११ कोटी अदा केली आहे. सर्वांच्या सहकार्याने सन २०२३-२४ या सालाच्या गळीत हंगाम पूर्ण झाल्याने सर्वांचे आभार. हंगाम पूर्ण झाल्याने ४ व ५ मार्च रोजी कारखान्यास सुट्टी जाहीर केली आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

थोडे नवीन जरा जुने