Top News

5 मार्च रोजी एकसंब्यात रंगणार तब्बल 51 लाखाची बैलगाडी शर्यतीचा थरा

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  कर्नाटक राज्याचे विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ५ मार्च रोजी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि एक्ससंभा येथील हुक्केरी परिवाराच्या चाहत्यांकडून भव्य आंतरराज्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती शर्यत कमिटी सदस्यांनी दिली.

          या बैलगाडी शर्यती साठी एकूण ९.५ किमी अंतराची शर्यत दोन गटात होणार आहे. 'अ' गटात प्रथम बक्षीस १७ लाख रुपये, द्वितीय ९ लाख, तृतीय ५ लाख, चौथे २ लाख रुपये तर 'ब' गटा साठी प्रथम ९ लाख रुपये, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख आणि चतुर्थ बक्षीस १ लाख रूपये अशी बक्षिसांचा आयोजन करण्यात आले आहे. एकूण ५१ लाख रुपयांची बक्षिसे असून प्रत्येक विजेत्याला ढाल आणि निशाणी देण्यात येणार असल्याचे शर्यत कमिटीचे सदस्य सुनील सप्तसागर यांनी सांगितले. एकसंबा - लिकवाड मैदानात आयोजित शर्यतीला अंदाजे ५ लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शर्यतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी सदस्यांनी दिली. स्पर्धकांनी प्रवेश नोंदणीसाठी शर्यत समिती कार्यालय, लिबरल को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेच्या इमारतीत संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे सदस्य उमेश सातबर यांनी केले. यावेळी बाळासाहेब पाटील, पुंडलिक खोत, किरण माळी, मल्लू हवालदार, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. * न भूतो न भविष्य अशी ही चिकोडी तालुक्यातील एक्स्संभा येथे होणाऱ्या बैल गाडी शर्यतीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कमिटी कडून करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने