Top News

निसर्गाच्या कुशीतील पोमाजे रिसॉर्ट

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

मजरेवाडी, तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील कुरुंदवाड अकीवाट रस्त्याला मजरेवाडी येथे 3 एकर चिकूच्या बागेत ग्राहकांसाठी निसर्ग रम्य रिसॉर्ट कार्यरत आहे, हे रिसॉर्ट मनोज दादासो पोमाजे यांच्या मालकीचे असून याची सुरुवात त्यांनी 2005 साली चिकू बागेबाहेर रस्त्यावर चिकू विकून सुरुवात केली..

त्यानंतर 2010-2011 साली त्यांनी हॉटेल टाकून त्यामध्ये नाश्ता, जेवण आणि सेंद्रिय चिकू शेक देण्यास सुरुवात केली.

चिकूच्या बागेत हुरडा पार्टी सुरु करण्याची कल्पना त्यांना शिर्डी भागात फिरायला गेले असताना तिथे बागेतील हुरडा पार्टी बघून सुचली. त्यांनी 2023 मध्ये चिकूच्या बागेत ग्राहकांसाठी हुरडा पार्टी सुरु केली यामध्ये त्यांनी ग्राहकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये चांगली बसण्याची सुविधा वेगवेगळे मनोरंजक खेळ, गाणी यांची सुविधा दिली; आणि खाण्यामध्ये जुन्या पद्धतीची भरली वांगी, चपाती किंवा भाकरी, मसूर, मक्याचं कणीस, गुलाबजाम सेंद्रिय चिकू चा चिकू शेक, नाश्ता मध्ये भजी, आणि विविध प्रकार चा नाश्ता येथे दिला जातो; त्याचबरोबर सेंद्रीय चिकू ही ते विकतात.

ग्राहक त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत एक दिवस निवांत वेळ घालवण्यासाठी पोमाजे रिसॉर्ट ला भेट देतात. पोमाजे रिसॉर्ट ला चांगलीच पसंती मिळाली आहे, त्यामुळे येथे सतत गर्दी असल्यामुळं एक दिवस अगोदर बुकिंग करावी लागते.शेतीसोबत जोडधंदा कसा करावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी चिकू बागेत रिसॉर्ट चालु करून दिले आहे.

थोडे नवीन जरा जुने