संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील विजय बदामे हे 1996 यावर्षी भरती झाले. त्यांचे ट्रेनिंग बेंगलोर या ठिकाणी झाले. त्यांनी आतापर्यंत भारतीय सेना मध्ये आपली सेवा जम्मू, चंदिगड, डेहराडून, कुपवाडा, दिल्ली, मुंबई, अरुणाचल प्रदेश, गया (बिहार), सिमला, सियाचीन, या ठिकाणी आपली सेवा बजावलेली आहे. सध्या ते पुणे येथे कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांची सेवा 27वर्षे पूर्ण झालेली आहे.यांचे शिक्षण टाकळीवाडी येथील प्राथमिक शाळेत झाले. तसेच पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथे पूर्ण झाले. अतिशय जिद्दीने हे भारतीय सेना मध्ये भरती झाले. आहेत यांचे बंधू सुद्धा नुकतेच नायक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत यांनी सुभेदार मेजर पद मिळवले. गावामध्ये यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
