हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील ऐतिहासिक हनुमान मंदिर गाभाऱ्याच्या बांधकामासाठी शनिवार दि. ६ रोजी रात्री झालेल्या बैठकीत तीन लाख रुपयांचा निधी गावातील दानशूर व्यक्ती भक्त मंडळांच्या कडून जाहीर करण्यात आला होता. अजून दहा ते बारा लाखांच्या निधीची गरज असल्याने आज शनिवारी सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिरात पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
हेरवाड गावाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने येथील पुरातन काळातील हनुमान मंदिराचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. या मंदिरासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी निधी लावला असून मंदिरासमोरील काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, मंदिराचा गाभारा पूर्ण करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेत निधीची तरतूद नसल्याने सदरचा गाभारा हा लोकवर्गणीतून पूर्ण करण्याची गरज असल्याने यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये गावातील अनेक दानशूर आणि तसेच भाविकांनी तीन लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. अजून १० ते १२ लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याने आज पुन्हा बैठक होणार आहे.
.jpg)