Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक रविवार होणार : सचिव अरुण भंडारे

 कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक रविवार दिनांक १८/२/२०२४ रोजी सर्किट हाऊस कोल्हापूर येथे होणार आहे.या बैठकीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवर पक्ष संघटन वाढविणे ,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेवून जनसामान्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुजविण्याचा निर्धार करणेत येणार आहे.त्यामूळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले आहे.हातकण़गले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती,जिल्हा सचिव अरुण देवाप्पा भंडारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

         या बैठकीस महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष मा.पंडित आण्णा कांबळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते माजी आमदार राजीव आवळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल कांबळे,जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदिप बिरणगे,कोल्हापूर शहराध्यक्ष आर.के.पोवार, मा.अशोक आळतेकर सर,कोल्हापूर शहराध्यक्ष नागेश फरा़ंडे, निपाणी तालुकाध्यक्ष अमर विठे,व कोल्हापूर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे सर्व तालुका पदाधिकारी.मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने