Top News

जिल्हास्थरीय खो - खो स्पर्धेत मुलीच्या संघाने विजेतेपद पटकावले

 


 सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

खणदाळ ता.गडहिंग्लज येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या मुलीच्या संघाने खो खो स्पर्धेत विजेतेपद पटकावून शाळेचा आणि गावचा नाव उज्वल केले कुरुंदवाड येथे झालेल्या जिल्हा स्थरीय शासकीय खो खो स्पर्धेत अंतिम सामना राधानगरी तालुका संघाशी होता. या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले ते सरपंच व शिक्षक रवींद्र यरकदावर, अमित चव्हान, मारुती कोलुनकर, संभाजी पाटील, युवराज भोसले तर मुख्याध्यापक लक्ष्मण कागीलकर यांचे प्रोत्साहन लाभले.

विजयी संघात राधिका चिरमुरे (कर्णधार) ,संजीवणी हुद्दार , समृद्धी कोटगी, अक्षरा मांगले ,श्रवंती कडलगे,आकांक्षा गायकवाड, सेजल घोडके, परिमला देसाई, विद्यार्श्री धनवडे, पर्वा चिरमुरे, आसमा मुल्ला, सलोनी घोडके, लक्ष्मी मुदपाकी, सवित्री मोरे, मनुजा घोडके या खेळाडूंचा समावेश आहे.

थोडे नवीन जरा जुने