प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरूवार दि. १५ रोजी संत रविदास महाराज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य इचलकंरजी यांच्या वतीने गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम आवडे, राहुल खंजिरे, महेश पाटील तसेच संत रविदास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब निर्मळे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. तसेच संत रविदास महाराज संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व इचलकरंजी परिसरातील जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. इचलकंरजी जनता बँक मलाबादे चौक येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
