प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या आदेशानुसार १४ रोजी कबनूर येथील सतीश चव्हाण यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
सतीश चव्हाण यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन कोल्हापूर जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस पाल्य यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी बरीच आंदोलने केली आहेत. पोलिसांसाठी आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सतीश चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. सतीश चव्हाण यांच्या निवडीबद्दल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
