Top News

हेरवाड मधील हनुमान मंदिर पुर्णत्वासाठी आज होणार बैठक

हेरवाड / प्रतिनिधी - 

रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला होता, मात्र, हेरवाडचे जागृत देवस्थान असणाऱ्या पवनपुत्र हनुमानाला सलग १४ वर्षे वनवास भोगावा लागला आहे. पवनपुत्र हनुमानाला या वनवासातून बाहेर काढण्यासाठी रखडलेल्या गाभारा बांधकामासाठी गावातील दानशूरांनी ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आज शनिवारी सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदीरात सर्व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

   मंदिराचा गाभारा पूर्ण करण्यासाठी १५ ते २० लाख रुपयांच्या निधीची गरज असून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बांधकामासाठी गावातील प्रतिष्ठीत नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करुन गेल्या १४ वर्षे रखडलेल्या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आजच्या होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

थोडे नवीन जरा जुने