Top News

हेरवाड : हनुमान मंदिर गाभारा बांधकामासाठी तीन लाखांची देणगी जाहीर

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या १४ वर्षापासून रखडलेले हेरवाड येथील ऐतिहासिक हनुमान मंदिराच्या पूर्णत्वाचे काम ग्रामस्थांनी चांगलेच मनावर घेतले आहे. मंदिर गाभाऱ्याच्या बांधकामासाठी शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत तीन लाख रुपयांचा निधी गावातील दानशूर व्यक्ती भक्त मंडळांच्या कडून जाहीर करण्यात आला आहे. अजून दहा ते बारा लाखांच्या निधीची गरज असल्याने प्रत्येक शनिवारी बैठकीच्या माध्यमातून देणगी गोळा केली जाणार आहे. 

 हेरवाड गावाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने येथील पुरातन काळातील हनुमान मंदिराचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. या मंदिरासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी निधी लावला असून मंदिरासमोरील काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, मंदिराचा गाभारा पूर्ण करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेत निधीची तरतूद नसल्याने सदरचा गाभारा हा लोकवर्गणीतून पूर्ण करण्याची गरज असल्याने यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये गावातील अनेक दानशूर आणि तसेच भाविकांनी तीन लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. या बैठकीत गावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गाभारा बांधकामासाठी अजून १० ते १२ लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याने पुढच्या शनिवारी देखील बैठक होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने