Top News

ट्रक मधील गॅसची अचानक गळती ? ; स्फोट होईल या भीतीने नागरिकांची पळापळ

 


शिरोली / शिवार न्यूज नेटवर्क :

पुणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर बायोगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रक नागरिक मधील गॅस गळती अचानक सुरू झाली.यामुळे आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रचंड घबराट निर्माण होऊन स्फोट होईल या भीतीने नागरिक व रुग्णांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढला.

 गॅसच्या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज कांही काळ बंद ठेवण्यात आले होते. बत्तीस शिराळा येथून बायोगॅसच्या टाक्या भरून एक ट्रक कागलच्या दिशेने जात होता. हा ट्रक शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आला असता ट्रक मधील काही बायोगॅस टाक्यांचा व्हाँल्व निकामी झाल्याने मोठा आवाज झाला व हवेत गॅस मिसळू लागला. गॅसचा स्फोट होईल या भीतीने नागरिक व रुग्णांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन आश्रय घेतला. गँसची दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्य केंद्रातील काही रुग्ण उपचार न घेताच घरी निघून गेले तर काही रुग्ण स्फोटाच्या भितीने सुरक्षित ठिकाणी आश्रयास गेले. 

हि गॅसची गळती कंपनीचे अधिकारी व स्थानिक नागरिकांनी बंद केली. या गॅस गळतीमुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.

थोडे नवीन जरा जुने