अभिनंदन सुंके / शिवार न्यूज नेटवर्क :
युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उधोगशील होऊन स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रत्येक तरुणांनी छोटे मोठे उद्योग धंदे उभारून उधोजक बनावे असे प्रतिपादन युवा नेते व यद्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी केले
ते खिद्रापूर तालुका शिरोळ येथे पद्मावती मेडिकल या फर्मच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समिती अध्यक्ष आण्णासाहेब कुरुंदवाडे हे होते यावेळी पद्मावती मेडिकल चे उदघाटन अजय पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल श्रीकांत पाच्छापुरे यांनी केले प्रस्ताविक अभिराज सहकारी दूध संस्थेचे चेअरमन अभिनंदन सुंके यांनी केले तर आभार हिदायत मुजावर यांनी मानले यावेळी पद्मावती मेडिकल चे सर्वेश लिंबेकर , स्नेहल शेटे, सुप्रिया लिंबेकर, सह दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील, पोलीस पाटील दीपाली पाटील, ग्रा प सदस्य बापूसो लडगे, राजेंद्र सुंके, भूषण मोने, रावसाहेब रायनाडे, बाळासो गुरव, मलगोडा पाटील,युवराज लिंबे ,चेतन शेटे , मोहन मोने अरिहत रायनाडे, सम्मेद रायनाडे, राजेंद्र बडसुंके, आदी मान्यवर उपस्थित होते.
