अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी तालुक्यातील नवलिहाळ येथे काल सदलगा शहरात प्रस्थापित होण्यासाठी कोल्हापूरहून आगमन होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे काल रात्री आगमन झाले . मूर्तीच्या आगमनास बराच उशीर झाला तरीही तेथील गावकऱ्यांनी मोठ्या जोशात चिकोडी- निपाणी रस्ता ,ते शहरातील प्राथमिक शाळा ,वाघमोडे गल्ली येतपर्यंत पारंपारिक शिवकालीन वाद्यांचा वापर करून आणि जागोजागी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक शिवशंभो मर्दानी आखाडा या मंडळांनी सादर करून संपूर्ण गाव शिवमय आणि भगवामय करून मोठ्या उत्साहात मिरवणूक मोठ्या गर्दीने पूर्ण केली.
प्रस्थापित होण्यासाठी नवलीहाळ ग्रामी आगमन झालेल्या मूर्तीची पूजा श्रीमान श्रीमंत जयरामराव घोरपडे सरकार , श्रीमंत संताजीराव घोरपडे सरकार आणि ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सचिन हुक्किरे ,गाव कामगार पाटील शिवगोंडा पाटील, मनोहर वाघमोडे ,संजय गुरव , मारुती कवलापुरे, उत्तम शिंदे ,दिलीप लोहार, सचिन लट्टे, नवलीहाळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मराठा समाज व गावातील सर्व समाजातील नागरिक यांच्या वतीने करण्यात आली. नंतर मूर्तीचे चिकोडी कडे प्रस्थान झाले.
