शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य सरकार मराठा समाजास आरक्षण देण्यास विलंब लावत असल्याच्या निषेधार्थ शिरोळात सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारची दशक्रिया विधी करून बोंब ठोक आंदोलन करण्यात आले या आंदोलनास आज अर्जुनवाड येथील मराठा समाज बांधव यांनी पाठिंबा दिला शिरोळ शहरातील भजनी मंडळांनी आंदोलन स्थळी भजन गात सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य सरकार मराठा समाजास आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्याची भावना मराठा बांधवांची होत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्याकरता येथील शिवाजी चौकात रविवारपासून चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलन करण्यात येत आहेत बुधवारी शासनाचा तिरडी मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते आज गुरुवारी आंदोलनस्थळी शासनाचा दशक्रिया विधी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला तसेच शासनाविरोधात बोंब ठोक आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाज निमंत्रक धनाजी पाटील नरदेकर माजी आमदार उल्हास पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवा नेते विराजसिंह यादव पृथ्वीराजसिंह यादव दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव दरगू गावडे गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख माजी उपसभापती सचिन शिंदे उल्हास उत्तमराव पाटील बाळासाहेब कोळी देवाप्पा पुजारी धीरज शिंदे गुरुदत्त देसाई शेखर पाटील बारवाडकर भालचंद्र ठोंबरे रामचंद्र पाटील सिताराम शिंदे दिलीप संकपाळ रावसाहेब माने अमित उर्फ बंटी संकपाळ विजय चव्हाण संजय गावडे विजय देसाई बाळासाहेब जगदाळे दत्तात्रय सावंत रमेश पाटील अक्षय काळे विनायक गावडे युवराज संकपाळ शिवाजी जाधव यांच्यासह शहरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुवारी बाल शिवाजी मंडळ त्रिमूर्ती मंडळ आणि सुरभी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
