Top News

सौ.सोनाली तेरदाळे यांना पीएचडी पदवी, पीएचडी पदवी मिळविणारी शहरातील पहिलीच मुलगी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 
                 

  निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील भूपाल तेरदाळे यांची कन्या , सौ .सोनाली तेरदाळे यांनी धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाकडून पीएचडी पदवी मिळविले.

सोनाली यांनी हिंदी विषयावर सातत्याने संशोधन केले व कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथून "साहित्य अमृत पत्रिका मे प्रकशीत कहानियो मे चित्रित विविध समस्याओंका विवेचन 2006 से 2015" हा प्रबंध सादर करून पीएचडी प्राप्त केली आहे.

 त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण के.एस.पाटील हायस्कूल, बोरगाव येथे केले .आणि नंतर कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथून हिंदीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

सोनाली गरिबीत वाढली आणि तिने कठोर परिश्रम घेऊन संशोधन पूर्ण केले.

हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. झेड.ए. गुळगुंडी यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले असून अत्यंत चिकाटीने त्यांनी पीएचडी पदवी मिळवली आहे .त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पीएचडी पदवी मिळवणारी शहरातील पहिलीच मुलगी म्हणून सोनाली ठरलेली आहे.

आपण ध्येय ठरवून शिक्षण पूर्ण केल्यास आपणास नक्कीच यश मिळते. यासाठी आम्ही परिश्रम ही केले पाहिजे .सातत्य परिश्रमाने कोणतीही क्षेत्रात आपण यश मिळू शकतो. माझ्या यासाठी सर्व शिक्षकांचे व कुटुंबाचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे यावेळी सोनाली यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने