Top News

जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे नावलौकिक

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

मुडलगी येथे झालेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत बोरगावच्या श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या माध्यमिक गटाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळावीत त्यांची दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कोम्बेत्तू पुत्तुर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विजेत्या विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

स्पर्धेत दर्शन मगदूम याने तिहेरी उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.शिवाय अथर्व भिवरे याने 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम व अडथळा शर्यती मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्याचबरोबर आनंद पाटील यांनी थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर भालाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर मुलांच्या 4×100 रिले स्पर्धेत दर्शन,अथर्व,राकेश,सधर्म गटाने प्रथम क्रमांक पटकावत सर्वांनी राज्य पातळीवर होणाऱ्या क्रिडा स्पर्धेसाठी वर्णी लावली आहे.

जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत भाग घेवून राज्य पातळीवर स्पर्धेसाठी निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्थेचे चेअरमन आण्णासाहेब हवले यांच्यासह, दाहिक शिक्षक प्रशांत पाटील,मुख्याध्यापक एस एस कोळी,मुख्याध्यापक राजू खिचडे,नेमिनाथ बारवाडे,अजित हवले,माळाप्पा गावडे यांच्यासह अन्य शिक्षक वृद्धांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या सर्व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले,बाबासाहेब पाटील,अनुज हवले,विद्याधर अम्मानावर,रावसाहेब तेरदाळे, शिवाप्पा माळगे, यांच्या हस्ते करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने