Top News

उद्या हेरवाड बंद ; मराठा बांधव करणार शासनाचा दशक्रिया विधी..!

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आंदोलनाची धग वाढत असून ठिकठिकाणी उपोषण, बंद, नेत्यांना गावबंदी, कँडल मार्च, रास्ता रोको, पोस्टरला काळे फासणे, सदस्यपदाचा राजीनामा आदी विविध प्रकारची आंदोलने करत मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला जात आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण होत चालले आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथेही गुरुवारी शाळा व दूध डेअरी यासह अत्यावश्यक सेवा वगळता गांव बंद ठेवून शासनाचा दशक्रिया विधी करण्यात येणार असल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली.  

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर विविध आंदोलने, मोर्चे तीव्र स्वरूपात करण्यात येत आहेत. हेरवाड येथील मराठा समाज बांधवांचे वतीने लोकप्रतिनिधी तसेच राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आहे. गुरुवार दिनांक २ रोजी सकाळी नऊ वाजले पासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून या दिवशी संपूर्ण गाव बंदची हाक मराठा समाज बांधवांनी दिली आहे. एक दिवशीय उपोषणामध्ये सरकारचा दशक्रिया विधीही करण्यात येणार असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज बांधव शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी मराठा बांधवांनी बोलताना दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने