हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. सरपंच रेखा जाधव,पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार, सदस्या विजयमाला पाटील, छाया सूर्यवंशी, विद्या माने, शितल कांबळे, हेरवाडच्या समुदाय आरोग्याधिकारी डॉ.वंदना गिरमल उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका चावरे यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शन समुदाय आरोग्याधिकारी डॉ.वंदना गिरमल यांनी केले. सरपंच जाधव यांनी अंगणवाडीसाठी जी काही मदत लागेल, ते सर्व आमच्याकडून त्यांना मिळेल. तसेच गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रमात नवनियुक्त तिन्ही मदतनीसांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार अकिवाटे यांनी मानले. सूत्रसंचलन सुजाता गुरव यांनी केले. कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता गुजर यांचे सहकार्य लाभले.
