शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यामध्ये कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरणेत येणार आहेत. कोतवाल भरतीकामी आरक्षण सोडत गुरुवार (दि. १०) रोजी दुपारी (दि.१०) ३.०० वाजता तहसिल कार्यालय शिरोळ येथे काढणेत येणार आहे. या आरक्षण सोडतकामी संबंधित सजाचे गावामध्ये नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सजातील समाविष्ट गावांची नावे- यड्राव, शिरदवाड, शिवनाकवाडी, हसूर, कुटवाड, घालवाड, मजरेवाडी, बस्तवाड, हेरवाड, तेरवाड, दानवाड, दत्तवाड, अकिवाट, निमशिरगांव, तमदलगे, धरणगुत्ती, जयसिंगपूर या गावांचा समावेश आहे.
