जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
संजय घोडावत विद्यापीठाचे औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या आवश्यकतेनुसार “इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएट्स व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे” हे लक्ष्य आहे. त्यानुसार विद्यापीठातील सर्व विभागातील विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी इंडस्ट्रीज मध्ये प्राशिक्षणासाठी पाठवले जाते.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात बी. फार्मसीच्या व डी. फार्मसीच्या 160 विध्यार्थ्यांची देशातील विविध फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजमध्ये ट्रैनिंगसाठी निवड झाली.
यामध्ये फायझर इंक जर्मनी–गोवा, सिप्ला प्रायव्हेट लिमिटेड–गोवा, डायसेल चिरल टेक्नॉलॉजी–हैदराबाद, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (पीएसयू)–पुणे, हॅफकिन्स बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसयू)–पुणे, मायक्रोलॅब्स प्रायव्हेट लिमिटेड–गोवा, पिरामल फार्मा सोल्युशन्स-महाड, गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल लि.–मुंबई, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल लि.–मुंबई, ब्लू क्रॉस लॅबोरेटरीज–गोवा, सिग्मा लॅब-गोवा, लुपिन प्रायव्हेट लिमिटेड-गोवा, सनोफी अव्हेंटिस इंडिया इंक, फ्रान्स-गोवा, मेड्रिचमेजी ग्रुप इंक, जपान-बंगलोर, ऍबॉट लॅब, गोवा, मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन-कोल्हापूर, लोरियल इंडिया इंक, पॅरिस फ्रान्स–पुणे, एसीजी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड– मुंबई, एमक्यूर फार्मास्युटिकल्स लिमिटेड–पुणे, ओरियन क्लिनिकल रिसर्च–पुणे, एमक्योर फार्मास्युटिकल्स–पुणे, वेर्गो क्लिनिक्स–गोवा, सिम्बायोसिस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड–सांगली, अरिहंत फार्मास्युटिकल्स–सांगली, राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज आणि सीपीआर हॉस्पिटल-कोल्हापूर, मार्क्सन्स फार्मा लिमिटेड-गोवा, रिपकॉर्ड फार्मास्युटिकल्स–कोल्हापूर, वेलनेस फॉरएव्हर, मेड रिलीफ या सारख्या देशपातळीवरील नामांकित इंडस्ट्रीचा समावेश आहे.
इंटर्नशिपमुळे औद्योगिक क्षेत्राचा अनुभव पदवी पूर्ण करण्यापूर्वीच मिळतो व विविध कौशल्ये वाढविण्यासाठी मदत होते. तसेच व्यवहारी जीवनातील शिस्त, टाईम मॅनेजमेंट, मल्टिटास्किंग यासारखे ऐकलेले शब्द अनुभवास मिळतात. विधार्थ्याना उद्योगक्षेत्रात प्रशिक्षण संधी देउन, विद्यापीठाने पुन्हा एकदा शिक्षणातील उत्कृष्टतेची आपली बांधिलकी दाखवून दिली आहे.
विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळण्यासाठी इंडस्ट्री युनिव्हर्सिटी रीलेशन्स संचालक डॉ.नितीन पुजारी, विभाग समन्वयक सुरज पाटील, विभाग प्रमुख विद्याराणी खोत, फार्मसी डीन डॉ. सुभाष कुंभार, टीपीओ हेड डॉ.स्वप्नील हिरीकुडे, प्रा. टी. एस. जंगम व सर्व प्राध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडेमिक डीन डॉ. विवेक कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
