Top News

कुत्रा चावल्यास वेळीच औषध उपचार करा : पशुवैद्य पशुअधिकारी डॉ मल्लिकार्जुन धर्ममट्टी

 


 बोरगाव येथील के एस पाटील हायस्कूल मध्ये परिसंवाद कार्यक्रम संपन्न           

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :        

 मानव हा समाजशिल प्राणी आहे. दैनंदिन जीवनात मानवास प्राण्यांचा सहवास होतच असतो. कुत्रा हा मानवाचा पाळीव प्राणी आहे, मात्र जर का कुणाला पिसाळलेला कुत्रा चावल्यास लगेचच रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घ्यावे, कुठलाही प्राणी किंवा पाळीव जनावरे चावल्यास शासकीय दवाखान्यातील औषध उपचार करावे असे प्रतिपादन बोरगाव येथील सरकारी जनावर दवाखान्याचे वैद्याधिकारी मलिकार्जुन धर्ममत्ती यांनी केले ते बोरगाव शिक्षण संघ संचलित के एस पाटील माध्यमिक शाळा व पशु संगोपन आरोग्य विभाग बोरगाव यांच्या संयुक्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

    बोरगाव येथील के एस पाटील हायस्कूल हे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन सोबत व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने अनेक प्रबोधनपर कार्यक्रम राबवीत असतात. मोबाईलच्या युगात विद्यार्थ्याला सभोवतालच्या व्यवहाराची माहिती मिळावी या उद्देशाने शाळेच्या सभागृहात पशुवैद्य अधिकारी डॉ मलिकार्जुन धर्ममती यांचे कुत्र्यापासून होणारे रोग या विषयाचे व्याख्यान आयोजन केले होते, जर का कुत्र्याच्या तोंडातून सतत लाळ पडत असेल तर ते कुत्रे पिसाळलेले आहे असे समजावे . अशा प्रकारचा कुत्रा चावल्यास रेबीज हा रोग होतो. त्यावेळी नजीकच्या सरकारी दवाखान्यात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे 

       कुत्रा चावून औषधोपचार न केल्यास कालांतराने रुग्णास रेबीज ची लागण होऊन प्रसंगी आपला प्राण गमवावा लागतो, त्यासाठी विद्यार्थ्याने सावधगिरी बाळगावी असे आवाहन बोरगाव पशुवैद्याधिकारी मलिकार्जुन धर्म मती यांनी केले

       या कार्यक्रमास मुख्याध्यापक पी ए धुळा सावंत, पी एम उगारे , आर के सौंदे, सहाय्यक पशू संगोपन अधिकारी सुभाष पवार सह सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन. पी ए चौगुले तर आभार श्रीमती व्ही. ए. आलासे यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने