कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
आ. श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, कसबा वाळवे या ठिकाणी माता पालक मेळावा आयोजित केला होता याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा.विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर यांनी उपस्थित माता-भगिनींना संबोधित करताना आपल्या मुलाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्याच्यावर सुसंस्कार करा. त्याला स्वातंत्र्य देऊन माणूस घडविण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन केले.
विद्यार्थी हा अनुकरणशील असतो, त्यामुळे तुम्ही टीव्ही पाहणे,मोबाईल हाताळणे बंद करा. त्याला सकस व पूरक आहार द्या. आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे. त्यामुळे त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी त्यांच्याशी जवळीकता करा. त्यांना स्वतःची जाणीव करून द्या. विविध स्पर्धा परीक्षांचे बाळकडू त्याला शालेय वयामध्येच द्या. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी थोर महान व्यक्तींचे दाखले देऊन मातांना मंत्रमुग्न करून सोडले.
मेळाव्याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी ३०० पेक्षा अधिक माता पालक उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अशोकराव फराक्टे, उपाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संचालक मा.श्री.शामराव दादा खोत, संचालिका व मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. तेजस्विनीताई घाटगे, मा. जिल्हा परिषद सदस्या व सहा. शिक्षिका सौ सुमित्रा उमेशराव भोईटे, मा.श्री. विश्वासराव घाटगे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेश संकपाळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक सहा. शिक्षक श्री.बाजीराव सुतार यांनी केले व आभार सहा. शिक्षिका सौ उज्वला भगत यांनी मांडले.
