Top News

इचलकरंजी कृष्णा नळ योजनेला शिरढोण मध्ये गळती

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

  शिरढोण ता शिरोळ येथील माळभागावरील पाणदारे वसाहतीजवळ इचलकरंजी कृष्णा नळ योजनेच्या जलवाहिनीला सोमवारी सायंकाळी गळती लागली. या गळतीमुळे रस्त्यासह नागरी वस्तीतील घरांभोवती तळ्याचे स्वरूप आले होते. मात्र या योजनेला वारंवार गळती लागत असताना इचलकरंजी महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना होत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.

   इचलकरंजी कृष्णा नळ योजनेला शिरढोण येथे वारंवार गळती लागत आहे. माळभागावर गत महिण्याभरापूर्वी गळती लागली आहे. गळतीमुळे रस्ता तर खराब झाला आहेच शिवाय या भागात दलदल निर्माण होवून डासांचे साम्राज्य वाढले आहे. गळती काढण्यासाठी नागरीक, ग्रामपंचायत पदाधिकारी वारंवार महापालिका पाणी पुरवठा विभागाला कळवूनही अद्याप गळती काढली नाही. त्यातच सोमवारी सायंकाळी माळभागावरील पाणदारे वसाहतीजवळ गळती लागल्याने परीसराला तळ्याचे स्वरूप आले होते. गळतीची माहीती नागरीकांनी महापालिकेला दिल्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र वारंवार गळतीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

थोडे नवीन जरा जुने