शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना वाढीव नळ पाणीपुरवठा वीज बिलाचा प्रश्न भेडसावत आहे.अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलासा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून ऊर्जा मंत्री, जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्री व खाते प्रमुखासह मुख्यमंत्र्यां सोबत मुंबई येथे लवकरच बैठक आयोजित करून वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली .या बैठकीत शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा वाढीव बिला संदर्भात तालुक्यातील सरपंच व पदाधिकारी यांची बैठक झाली यावेळी शासनाने
ग्रामपंचायतीना आर्थिक सक्षम करून योजना राबविल्या पाहिजेत. नळ पाणी पुरवठ्याच्या वाढीव वीज बिलामुळे अडचणी येत असून वीज दरवाढ कमी करावे अशी मागणी सरपंच व काही पदाधिकार्यानी केली.
या बैठकीस सरपंच अमोल चव्हाण, रेखा जाधव, तानाजी माने, सचिन खुडे, कुणालसिंह निंबाळकर, धनाजी नंदीवाले, सचिन दानोळे , प्रशांत अपीने , शफी पटेल, अर्चना पाटील, डॉ.सी. डी. पाटील यांच्यासह अर्जुन जाधव, एम. एस. पाटील तसेच शिरोळ व इंचलकरंजी महावितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिरोळ पं स कार्यालयाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातर्फे नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी मदतीस उमेदवारांना आमदार यड्रावकर व गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली ' यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता गुजर , मनीषा पालेकर यांच्यासह नवनियुक्त मदतनीस व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
