Top News

माजी सैनिक शंकर कोळी यांच्या 'श्रमयोगी' पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

 


शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :

   शिरढोण (ता. शिरोळ) येथील प्रगतिशील शेतकरी माजी सैनिक शंकर भाऊ कोळी यांच्या संघर्षमय यशस्वी जीवनाचे ' श्रमयोगी ' या वास्तव लेखन पुस्तकाचे बुधवार (दि. १६) रोजी प्रकाशन होत आहे. येथील श्रीकृष्ण मंदीराच्या हाॅलमध्ये सकाळी दहा वाजता उद्यान पंडित व दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते, कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व शिरोळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बाबासो हेरवाडे भुषविणार असून कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील , जयहिंद सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन दस्तगीर बाणदार, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. चंद्रकांत मोरे, दत्त विकास सेवा संस्थेचे चेअरमन कल्लाप्पा टाकवडे, अविनाश खंजीरे विकास सेवा संस्थेचे संस्थापक अविनाश खंजीरे, इंचलकरंजीतील जेष्ठ लेखक अशोक केसरकर, पुस्तकाचे लेखक अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

  पुस्तक प्रकाशन सोहळा समितीत शिरोळ पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे , माजी जि. प. सदस्य विकास कांबळे, काॅ. आप्पा पाटील (अ. लाट), चैतन्य शिक्षण संस्थेचे संस्थापक दशरथ काळे (अ. लाट), हेरवाडचे माजी सरपंच सुरगोंडा पाटील, जानकी वृद्धाश्रमाचे स़स्थांपक बाबासाहेब पुजारी, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे, भाजपा नेते पोपट पुजारी यांचा समावेश असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पुस्तक प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने