जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
तारदाळ, कोरोची व खोतवाडी या गावांसाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती, या कामी आपण सातत्याने तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळेच या तिन्ही गावासाठी कोरोची येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे असे उदगार माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी काढले, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाठपुरावा करून तिन्ही गावची आरोग्याची मूलभूत सोय करून दिल्याबद्दल व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून दिल्याबद्दल तारदाळ गावच्या सरपंच सौ. पल्लवी पोवार, कोरोची सरपंच डॉ. संतोष भोरे, खोतवाडी सरपंच विशाल कुमार यांचेसह तिन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा त्यांच्या जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन सत्कार करण्यात आला,तारदाळ, कोरोची, खोतवाडी ही गावे झपाटयाने वाढली आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गोरगरिब रुग्णांची सोय व्हावी म्हणून डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व प्रसाद खोबरे यांनी योग्य पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले आहे अशी भावना यावेळी या तिन्ही गावच्या सरपंचांनी व्यक्त केली आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व प्रसाद खोबरे यांचे आभार मानले,या सत्काराप्रसंगी वैभव इंगळे,विनोद कोराणे, सचिन पोवार, गजानन नलगे, संजय चोपडे, अकबर करडी, पिंटू दाते, सुरेश पोवार, प्रविण पाटील, नितीन खोबरे, दत्तात्रय चोपडे, सावता माने, सचिन कांबळे, जीवन माने, निरगुडे मामा, वसंत चौगुले, बजरंग चोपडे, पिंटू मांदिये आदी उपस्थित होते.
