Top News

इचलकरंजीकरांना दूधगंगे मधून पाणी मिळणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

पंचगंगा प्रदूषण मुक्त करूनच इचलकरंजीला पाणी द्यावे याबरोबरच कृष्णा नदीची योजना सुरू आहे त्याची गळती काढावी व पाणी घ्यावे, इचलकरंजीकराना दूधगंगा नदीपात्रातून सुळकुड योजनेद्वारे पाणी दिले जाणार नाही, यासाठी आपला कायम विरोध राहील, इचलकरंजीच्या राज्यकर्त्यांनी पाण्यासाठी इतर नेत्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये भांडण लावू नये, दूधगंगा कृती समिती सोबत मी सदैव आहे असे प्रतिपादन माजी मंत्री व शिरोळ चे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

इचलकरंजीला खरंच पाण्याची गरज आहे का राजकारणासाठी सुळकूड पाणी योजना आहे हे तेथील राजकर्त्यांनी स्पष्ट करावे, पाण्यासाठी राजकारण करू नये शुद्ध पाणी हा सर्वांचा अधिकार आहे, पण पंचगंगा प्रदूषित करून इचलकरंजीकरांनी शिरोळ तालुक्यातील टाकवडे पासून सर्व गावांना दूषित पाणी दिले आहे याचीही इचलकरंजीकरांनी जाणीव ठेवावी, त्यामुळे दूधगंगा योजनेतून इचलकरंजीकरांना एक थेंब पाणी मिळणार नाही यासाठी मी आपल्या सर्वांसोबत आहे,त्यासाठी रस्त्यावर व सभागृहात दोन्ही ठिकाणी भांडण्यासाठी मी सदैव तयार आहे, मग सरकार कोणाचीही असो असे सांगताना शिरोळ तालुक्यातील आम्ही सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी संघटित राहून संघर्ष करू असेही आमदार यड्रावकर म्हणाले .

दत्तवाड ता. शिरोळ येथे दूधगंगा कृती समितीमार्फत झालेल्या एक दिवशी लाक्षणिक उपोषण व गाव बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गांधी चौक येथे बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तवाड चे सरपंच चंद्रकांत कांबळे होते.

इचलकरंजी सुळकुड पाणी योजना रद्द करावी यासाठी दत्तवाड सह घोसरवाड ,टाकळीवडी नवे दानवाड ,जुने दानवाड, येथील सर्व व्यवहार बंद करून या गावातील ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला याबरोबरच या पाच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दत्तवाड येथील गांधी चौक येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले.माजी आमदार उल्हास पाटील , भवानीसिंग घोरपडे, सुशांत पाटील, बाबासो पाटील, कर्नाटक बोरगाव येथील अण्णासो हावले , धनराज घाटगे, बबनराव चौगुले, बाळासाहेब पाटील अमोल शिवई ,मनोज कडोले, सागर कोडेकर , आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे दिपाली परीट, मिनाज जमादार, बाबासो वनकोरे, सी डी पाटील , नितीन बागे,यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी धनराज घाटगे, सागर कोडेकर, अमोल शिवई, मनोज कोडोले, बाळासो पाटील, विनायक आवळे, इंद्रजित पाटील, विजय आरेकर, अरूण मुदांना, क्रंतिकुमार पाटील, दतत्रय गायकवाड ,धनपाल जुगळे, साहेबराव साबळे, नंदकुमार नाईक, धन्यकुमार सिदनाळे , वैशाली पाटील ,उदय पाटील, महेंद्र बागे, भरत पाटील नूर काले,सुकुमार सिदनाळे, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नायब तहसीलदार योगेश जामदाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचा मार्गदर्शना खाली बीट अंमलदार सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने