Top News

ग्राहक कल्याण फाउंडेशन आयोजित पोस्टर स्पर्धेत अवनी माने तालुक्यात प्रथम

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर्स स्पर्धेत शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालयाची विद्यार्थिनी कु अवनी अवधूत माने (इ ७ वी) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला.

         शिरोळ तालुका ग्राहक कल्याण फाऊंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत सुमारे ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

दरम्यान, शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे व विकास बिक्कड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कु अवनी माने हिला रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी स्टेट बँकेचे सचिन कुलकर्णी, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे प्रमुख सुभाष माळी, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, वैद्यमापन अधिकारी मोदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .

थोडे नवीन जरा जुने