Top News

गुरुजनांकडून लाटवाडीचे सरपंच शितल अवघडी यांचा सत्कार

 


लाटवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

     केंद्रीय शाळा कन्या दत्तवाडचे अध्यापक श्री.शरद महादेव अवघडी यांचे ज्येष्ठ बंधू श्री.शितल महादेव अवघडी यांची लाटवाडीच्या सरपंचपदी निवड झालेबदल दत्तवाड केंद्रातील शिक्षकांच्याकडून सह्रदय सत्कार करणेत आला.

         केंद्रप्रमुख रमेश कोळी शुभेच्छा देताना म्हणाले, "सरपंचपदाची मिळालेली संधीचे सोने करा.गोरगरिब व तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करून लाटवाडीचा सर्वतोपरी विकास करा." तर सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीची सरपंचपदी निवड झालेने उपस्थित गुरूजनांनी समाधान व्यक्त करून नूतन सरपंच शितल अवघडी यांना शुभेच्छा दिल्या.

        यावेळी दत्तवाड केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश कोळी,मुख्याध्यापक संजय निकम,शामराव कांबळे,दत्तात्रय कचरे,दशरथ खोत,रामचंद्र खोत,शरद अवघडी,दिलीप शिरढोणे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने