बुबनाळ / शिवार न्यूज नेटवर्क :
बुबनाळ तालुका शिरोळ येथील बुबनाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुप्रिया मालगांवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुकुणा समितीने ठरवलेल्या प्रमाणे मावळते सरपंच सारिका राजमाने यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात मंडळ अधिकारी सी. पी. काळगे यांच्या अध्यक्षतेखाली एक खास सभा घेण्यात आली. या वेळी सुप्रिया मालगांवे यांची सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडी वेळी अविनाश ऐनापुरे , सुभाष शहापुरे , सुकुमार किनिंगे , रावसो गणे , नेमिनाथ ऐनापुरे , पुंडलिक कबाडे , जावाहर मरजे,कुमार किनिंगे ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
