Top News

कुरुंदवाद पोलिसांच्या मार्फत २६३ जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

  ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावा यासाठी गावात अशांतता निर्माण करणाऱ्या कुरुंदवाड पोलिस ठाण्याअंतर्गत निवडणूक असलेल्या गावातील कुरुंदवाड पोलिसांनी 263 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दहा जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव शिरोळ तहसिलदाराकडे दिला आहे. आणि दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सात जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिली.  

    ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू असल्याने निवडणूक असलेल्या गावातील अशांतता पसरविणार्या गुन्हेगारावर  पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.  शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलिस ठाण्याअंतर्गत अब्दुल लाट, लाटवाडी, शिवनाकवाडी, हेरवाड, अकिवाट, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, दानवाड, औरवाड अशा दहा गावांतील ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत. त्यामुळे या गावातील पोलिसांच्या हीटलिस्टवर असलेल्या गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांच्या कारवाईने सामान्य नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने