सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
वैशाली बुद्ध विहार व बौद्ध धम्म संस्कार केंद्र , जयसिंगपूर यांच्या वतीने गुरुवारी होत आलेल्या 32 व्या धम्म परिषदेसाठी शिरोळ येथील ऐतिहासिक नगरीतील तालुका पंचायत समितीच्या प्रांगणात 32 व्या बौद्ध धम्म परिषदेचा धम्म ज्योत प्रज्वलन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
येथील पंचायत समिती आवारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती शाहू महाराज, संविधान स्तंभ ,क्रांती ज्योत ,जिन स्तंभ यांना पुष्पहार अर्पण करून महाथेरो भन्ते डॉ.यशकाश्यपायन व नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी सेवक ग्रुप व समस्त बौद्ध समाज, शिरोळ नगरीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
नगराध्यक्ष पाटील यांच्यासह बौद्ध संस्कार मंडळाचे अध्यक्ष रमेश कांबळे व लातूरचे धम्म उपाशीका यांच्या हस्ते बौद्ध ज्योत प्रज्वलित करण्यात आली, त्यानंतर ही धम्मज्योत 32 व्या बौद्ध धम्म परिषदेसाठी जयसिंगपूर दिशेने रवाना झाली. यावेळी सेवक ग्रुपचे अशोक कांबळे चिदानंद कांबळे , अशोक कांबळे , मनोजकुमार रणदिवे सर ,अमोल होवाळे , अरविंद कांबळे, पा.मा.गुरुजी, सुनील पोळ, सुरज कांबळे , खंडेराव हेरवाडे, दगडू माने, सचेतन बनसोडे, संजय कांबळे, विलास कांबळे, सुरेश कांबळे , प्रसन्नजीत दीक्षान्त, प्रशांत कुरणे ,कुमार कांबळे,विकास बनसोडे, आकाश् कांबळे,उदय कांबळे,सुशांत कांबळे,प्रणोदीप कांबळे,मयूर पुजारी,किरण कांबळे,सुमित कांबळे,प्रवीण कांबळे, राहुल कांबळे यांच्यासह उपासक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज रणदिवे सर यांनी केले, सेवक ग्रुपचे प्रमुख चिदानंद कांबळे यांनी आभार मानले. यावेळी महाथेरो भन्ते काश्यपायन म्हणाले, धम्म परिषदेचा प्रारंभ शिरोळ नगरीतून झाला असून जयसिंगपूर येथे होत असलेल्या 32 व्या बौद्ध धम्म परिषदेतून पुन्हा विचारांची दिशा मिळेल, पण भगवान गौतम बुद्ध यांचा संदेश सर्वांच्या घरोघरी पोहोचला पाहिजे , या विश्वाला सुख शांती समाधान आणि समृद्धी हवी असेल तर बहुजनांच्या सुखासाठी, हितासाठी बौद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही.
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळ नगरीतून बौद्ध धम्म परिषदेचा प्रारंभ झाल्याने अभिमान वाटतो, लोकराजा शाहू महाराज यांच्या विचारांचा कोल्हापूर जिल्हा आहे , भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची प्रेरणा घेऊन लोकराजा शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची पद्धत सुरू केली, बौद्ध धम्म परिषद ही लोक कल्याणाकारी व दिशादर्शक आहे असे सांगून त्यांनी धम्म परिषदेस शुभेच्छा दिल्या.
