Top News

तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी बचावचा नारा : चिंचवाड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा

उदगाव / शिवार न्यूज नेटवर्क : 

चिंचवाड ता.शिरोळ येथील समस्त जैन बांधवांच्यावतीने झारखंड येथील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २६) मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत येथे नूतन सरपंच जालिंदर ठोमके यांना निवेदन देण्यात आले. 

जैन धर्मियांचे पवित्र असे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी ज्या ठिकाणी २० तीर्थंकर मोक्षाला गेले, अशा तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समस्त जैन बांधवांच्या भावना दुखावल्या असून हा निर्णय त्वरित रद्द करावा या मागणीसाठी चिंचवाड येथे मूक मोर्चा काढण्यात आला. मंदिराजवळ मोर्चा आल्यानंतर यावेळी मदनावली पाटील, स्वरूपा ककडे, प्रमोद चौगुले व तालुका सदस्य ऋत्विक चौगुले यांनी भावना व्यक्त केल्या. यानंतर ग्रामपंचायत येथे सरपंच ठोमके व पोलीस पाटील सरदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 

मोर्चात महावीर ककडे, रावसाहेब चौगुले, अजित चौगुले, सुदर्शन चौगुले, सुदर्शन ककडे, देशभूषण चौगुले, सुरगोंडा पाटील, दिगंबर पाटील, संजय चौगुले, कल्लाप्पा चौगुले, विजय चौगुले, मध्यवर्ती सदस्य संतोष ककडे यांच्यासह श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व श्री 1008 चंदप्रभू दिगंबर जैन मंदिर ट्रस्टमला मळाभाग, वीर महिला मंडळ, वीर सेवा दल सदस्य व शेकडो श्रावक - श्राविका उपस्थित होते. मोर्चाच्या संयोजन अभय चौगुले, अभिनंदन पाटील, आण्णासो मगदूम, अनिकेत ककडे, पार्श्व ककडे यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने