Top News

कुरुंदवाड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणपती कोळी, उपाध्यक्षपदी उमेश माळगे

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

  कुरुंदवाड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणपती कोळी (दै. लोकमत ), उपाध्यक्षपदी उमेश माळगे (BPN न्यूज), सेक्रेटरीपदी गोवर्धन माने (दै. जनप्रवास) व खजिनदारपदी नंदकुमार सुतार (दै. केसरी) यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार आनंदराव शिंगे होते. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रा. शरदचंद्र पराडकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील छत्रपती शाहू पतसंस्था सभागृहात या निवडी करण्यात आली. 

   बैठकीला जेष्ठ पत्रकार सुरेश कांबळे (दै. नवराष्ट्र), अनिल केरीपाळे ( दै. सकाळ), उत्तम भोई (दै. राष्ट्रगीत) कुलदीप कुंभार (लाईव्ह मराठी), संतोष तारळे ( संपादक, शिवार न्यूज नेटवर्क ), संदीप इंगळे (दै. महानकार्य) आदी उपस्थित होते.

निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष गणपती कोळी व उमेश माळगे म्हणाले, पत्रकारांच्या समस्या आणि विविध मागण्यांसाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.


थोडे नवीन जरा जुने